शेतकरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे चंदगड तहसिलमोर धरणे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

शेतकरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे चंदगड तहसिलमोर धरणे आंदोलन

संभाजीराव देसाई


चंदगड / प्रतिनिधी 

         दिल्लीच्या सीमेवर मोदी शासनाने कृषी व शेतकरी विरोधी पारित केलेल्या काळ्या कायद्याविरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत.त्याला पाठींबा देणाचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश कमिटीने घेतला आहे. काॅग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 3 रोजी सकाळी 11 वा.) चंदगड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकर्यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी केले आहे. No comments:

Post a Comment