आविष्कार फौंडेशन इंडिया संस्थेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2021

आविष्कार फौंडेशन इंडिया संस्थेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची निवड

                                 रवी पाटील

बेळगाव /प्रतिनिधी

     आविष्कार सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन महाराष्ट्र इंडिया संस्थेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी सीमाकवी रवींद्र पाटील यांची नुकताच निवड करण्यात आली.

   सीमाकवी रवींद्र पाटील हे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात बेळगाव व चंदगड तालुक्यात उल्लेखनिय कार्य असून त्यांच्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष , अखिल भारतीय क्षत्रिय मराठा परिषदचे प्रदेशाध्यक्ष व एनयुजे महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

या फौंडेशन चा त्यांना नुकताच कोल्हापूर येथे शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल  'राज्यस्तरिय गुणवंत शिक्षक ' पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मराठी भाषा, संस्कृती व आस्मिता संवर्धनासाठी बेळगाव येथे पहिले राज्यस्तरिय मराठी साहित्य संमेलन भरवून आपल्या कार्याची चुणुक दाखविली आहे.

रवींद्र पाटील हे कवी, पत्रकार, वक्ते,  निवेदक, समोलोचक व तंत्रस्नेही उपक्रमशिल शिक्षक ते एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

रवींद्र पाटील हे मुळचे कुद्रेमानी असून चंदगड शिनोळी बु. येथील राजर्षि शाहू विद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कोल्हापूर जिल्हाचा प्रेरणा पुरस्कार, दै. जनमतचा राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार व राजा शिवछत्रपती पारगड सन्मान व आदर्श पत्रकार अशा पुरस्काराने सन्मानित आहेत.

 आविष्कार फौंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव शैला कांबरे व नॅशनल को-ऑर्डिनेटर उज्ज्वला सातपुते यांच्या सुचनेनुसार बेळगांव जिल्हा फौंडेशनचे कार्य सर्वत्र  विस्तार वेगाने होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार यांनी निवडीचे पत्र दिले आहे. त्यांचा दि३ रोजी निपाणी येथील कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.



No comments:

Post a Comment