अडकूर येथे शासनाचे आधारभूत भात खरेदी केंद्र सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2021

अडकूर येथे शासनाचे आधारभूत भात खरेदी केंद्र सूरू


चंदगड / प्रतिनिधी

           अडकूर (ता. चंदगड) येथील ओमसाई काजू कारखान्यात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन यांच्या विद्यमाने व चंदगड तालुका कृषिमाल फलो.सह.खरेदी विक्री संघ दाटे यांचे मार्फत भात खरेदी केंद्र सुरू झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष उदयकूमार देशपांडे यानी दिली भात आधारभूत खरेदी किंमत प्रति क्विंटल रू.1868/रूपये राहणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ओम साई काजू कारखाना अडकूर येथे भात खरेदी केंद्र सुरू झाले आहे. शेतक-यानी भात विक्रीस घेवून येण्यापुर्वी अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतरच भात खरेदी ची तारीख दिली जाणार आहे. अर्जा सोबत भात पीक नोंद असणारा 7/12उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बॅंक पास बुक झेरॉक्स सोबत जोडणे आवश्यक आहे. जयमलहार कृषि  सेवा केंद्र अडकूर येथे यासंबधी माहिती, फाॅर्म व मार्गदर्शनासाठी  शेतक-यांनी संपर्क साधावा. No comments:

Post a Comment