ढोलगरवाडीची ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध - महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीने घेतलेल्या पुढाकाराला यश - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2021

ढोलगरवाडीची ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध - महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीने घेतलेल्या पुढाकाराला यश

चंदगड / प्रतिनिधी
       ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीचे निवडणूक बिनविरोध करण्यात महात्मा गांधी तंटामूक्त समितीला दुसऱ्यांदा यश आले.
      गावातील सातेरी देवीचे एक कोटीचे मंदीर  वर्गणी न जमा करता केवळ देणगीच्या माध्यमाने पुर्ण करणारे ढोलगरवाडी हे आदय समाजप्रवर्तक गाव आहे. या पंचकोशीतील विचारांची बिज ढोलगरवाडीतच पेरली जातात. त्यानंतरच त्याचा प्रसार इतरत्र होतो हा या गावचा इतिहास आहे. येत्या मे महिन्यात मंदीराच्या वास्तुशांती  सोहळयाचे नियोजन आहे. गेली ग्रामपंचायत व सेवा सोसायटी निवडणुकही आपल्या सर्व ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरुद्ध केली. या वर्षाही आपण ग्रामपंचायत बिनविरुद्ध करून समाजापुढे आदर्श ठेवू व शासनाच्या बक्षिसालाही पात्र होऊ असे आवाहन केले.  तंटामुक्त कीटीचे अध्यक्ष प्रा. सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला अनेक मतांतरे झाली शेवटी चार तासाच्या सखोल चर्चेअंती एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच कल्लापा पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण मेणसे,  एस.  डी. पाटील  गावातील सर्व पक्षांचे सक्रीय कार्यकर्ते बहुसंख्य ग्रामस्य उपस्थित होते. निवड झालेली ग्रामपंचायत सदस्य खालीलप्रमाणे बाबुराव ऊर्फ व्हन्नाप्पा रामचंद्र तूपारे, शोभा विलास कांबळे, सूस्मिता संंजय पाटील, प्रा. दीपक रामकृष्ण पाटील, चंद्रकांत कृष्णा सूतार, दमयंती गोपाळ सूतार हे सदस्य बिनविरोध निवडण्यात आले आहेत. 


No comments:

Post a Comment