समृद्ध राजाराम कांबळेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत कार्यासाठी नामांकन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2021

समृद्ध राजाराम कांबळेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत कार्यासाठी नामांकन

 

कु. समृद्ध राजाराम कांबळे

तेऊरवाडी  ( एस .के. पाटील )
          द थर्ड मीह्योडो इंटरनॅशनल युथ  व्हिज्वल मीडिया फेस्टिवल जपान येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कला संस्कृती  फेस्टिवलमध्ये कु. समृद्ध राजाराम कांबळे ,नेसरी यांने संगीतबद्ध केलेल्या 'ये कैसी आजादी 'या म्युझिक व्हिडिओ गीतासाठी *बेस्ट म्युझिक व्हिडिओ* नामांकनासाठी (जपान - मिह्योडो ) आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

  समृद्धने संगीतबद्ध केलेल्या या गीताला जपानमध्ये  'स्क्रीनिंगसाठी' नामांकन प्राप्त झाले आहे. या गीताचे चित्रीकरण आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत परदेशात झाले असून  हे गीत परदेशात सोशल मीडियावर खूपच गाजत  आहे.  या  गीताचं दिग्दर्शन पी. व्ही. स्नेहल  , गायन सुप्रिया अडकुरकर  हिने केले आहे आणि संगीत संयोजन दिग्दर्शन समृद्ध यांने केले आहे.
         समृद्ध गेली 14 वर्षे स्वरसाधना संगीत महाविद्यालय गडहिंग्लज येथे प्राचार्य मच्छिंद्र बुवा या गुरुंकडे शास्त्रीय संगीताचे धडे गुरुकुल पद्धतीने घेत आहे, त्याने यापूर्वी दुबई येथे सांस्कृतिक महोत्सवमध्ये शास्त्रीय गायनात  प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
         तसेच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर, जिल्हा, राज्य स्तरावर संगीत, शास्त्रीय गायन स्पर्धातून अनेक पारितोषिके, प्रमाणपत्र, मानसन्मान पुरस्कार प्राप्त केलेले आहे.याचीच पोचपावती म्हणून त्याला 2019 मध्ये  "युवा संगीतरत्न "हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्याला केंद्र सरकारची दिल्ली  सी. सी. आर.टी. स्कॉलरशिप 2014 पासून शास्त्रीय गायन क्षेत्रासाठी त्याला मिळत आहे. दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय  मार्फत होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात तो दिल्ली, हैदराबाद, मुंबई येथे सहभागी  झाला आहे. त्याने एका हिंदी अल्बमचे संगीत दिग्दर्शन, संयोजन आणि गायन केले आहे. कोरोनो च्या काळात त्याने अनेक संगीत,कला क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून कन्नड, मराठी, हिंदी , इंग्रजी अशा  अनेकविध गीते  आपल्या छोट्या  संस्कृती या बहिणी सोबत गायले आहेत. तसेच त्याने सी. सी. आर टी स्कॉलरशिप कलाकारांच्यासोबत ' त्राही असमान' या  गीतचे संयोजन दिग्दर्शन, कंपोजिंग,  गायन केले आहे.
         अलीकडेच  त्याने भारतीय संगीत क्षेत्रातील नामवंत, कीर्तिवंत संगीतकार अमित त्रिवेदी यांच्या सोबत ' मधुबाला  ' हे गीत गायन केले आहे. सध्या तो आपल्या घरूनच वेब सिरीज, मालिका, नाटक, एकांकिका यांचे संगीत संयोजन, दिग्दर्शन करत .आहे . या त्याच्या संगीत क्षेत्रातील यशाचे  मार्गदर्शन  प्राचार्य मच्छिंद्र बुवा सौ वर्षा बुवा, मा. शफी नाईकवाडी यांचे लाभले आहे.  डॉ. सदानंद पाटणे ऍड. हेमंत कोलेकर  मा.क. कांबळे गुरुजी.प्रा डॉ.आर .डी. कांबळे .  ए. आर. मटकर ,  आय.टी .नाईक यांचे प्रोत्साहन  लाभले आहे.
        समृद्धने ग्रामीण भागात राहून देखील शास्त्रीय संगीत सारख्या क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहे. सातासमुद्रापलिकडे  आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने संगीत क्षेत्रात केलेल्या कामगिरीची  दखल   आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नोंद करण्यात आली आहे.त्याने मारलेल्या गरुड भरारीबद्दल कै.अरुण पौडवाल मेमोरियल अकॅडमी संचलित, स्वर साधना संगीत महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सदानंद पाटने ,प्राचार्य मच्छिंद्र बुवा, सौ वर्षा बुवा आणि शिक्षण समिती क. नेसरी अध्यक्ष श्री ऍड. हेमंत कोलेकर यांनी विशेष कौतुक केले. तो सद्या शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी येथे इयत्ता बारावी सायन्स या वर्गात शिकत आहे. त्याच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात प्राप्त केलेल्या नामांकनामुळे ....यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.या नामांकनासाठी.. आंतरराष्ट्रीय कला, संस्कृती महोत्सवांमध्ये जगभरातील 2500 कलाकार सहभागी झाले होते त्यातून समृद्ध हा एकमेव भारतीय कलाकार आहे.


No comments:

Post a Comment