तेऊरवाडी येथे आमदार फंडातून रस्ता कामाचा शुमारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2021

तेऊरवाडी येथे आमदार फंडातून रस्ता कामाचा शुमारंभ

तेऊरवाडी येथे रस्ता कामाचा शुभारंभ करताना सरपंचा श्रीमती सुगंधा कुंभार, अशोक पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या गावांतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार, अशोक पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील यांच्या हस्ते झाला.
    येथील नवीन वसाहतीतील रस्त्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्ते कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच सौ. शालन पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे, सौ. संगीता पाटील, बजरंग पाटील, सुनिल पाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment