समतावादी जीवन सावित्री बाईंची शिकवण - प्रा. अर्चना रेळेकर, चंदगड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2021

समतावादी जीवन सावित्री बाईंची शिकवण - प्रा. अर्चना रेळेकर, चंदगड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. अर्चना रेळेकर, शेजारी प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. एस. एन. पाटील व प्राचार्य पी. आर. पाटील व  इतर.

चंदगड / प्रतिनिधी 

        स्वातंत्र्य, समता आणि बंधुता   या त्रिसुत्रीद्वारे समाजाला समतेची शिकवण देणारी पहिली शिक्षिका सावित्रीमाता होय. मनुवादी कर्मठ  संस्कृतिचा प्रखर विद्रोह झुगारून स्त्री शिक्षणाचा पाया रचताना त्याना आलेले अनुभव त्याना घडवत गेले. त्यांच्या संघर्ष गाथेची आठवण  या जयंती दिना निमित्ताने होते असे प्रतिपादन प्रा. अर्चना रेळेकर यानी  माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित "सावित्रीबाई फुले जयंती" व "माझी वसुंधरा हरित शपथ" कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ पी. आर. पाटील होते. 

       विद्यार्थ्यांना सकस व समृद्ध वाचन करून शक्य तितके आपल्या समाजाला अंधश्रद्धा,भृणहत्या, रूढी व परंपरांच्या  विळख्यातून मुक्त करा. सुधारवादी शिक्षणाची कास धरा. मनुस्मृतिच्या वास्तवाशी भिडायला शिका असा संदेश दिला. आज उच्च शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षण काळाची गरज बनली आहे. कोणताही धर्म वाईट नाही, पण त्याचा प्रचार चुकीच्या पद्धतीने होवू नये. विज्ञान हाच आज मितीला खरा मानवधर्म आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हेतूकथन प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी केले. कु सोनाली दळवी, सुजाता झेंडे, तय्यबा मुल्ला यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. मृणाली नाईकने केले तर आभार मिनल मोटर हीने मानले. कार्यक्रमाला सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment