चंदगड तालुक्यातील ४१ पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध? अनेक गावात काही जागा बिनविरोध, जाणून घ्या कोणत्या ग्रामपंचायती व जागा झालेत बिनविरोध? - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2021

चंदगड तालुक्यातील ४१ पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध? अनेक गावात काही जागा बिनविरोध, जाणून घ्या कोणत्या ग्रामपंचायती व जागा झालेत बिनविरोध?

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

     चंदगड तालुक्यात निवडणूका लागलेल्या ४१ ग्रामपंचायतीपैकी ८ ग्रामपंचायतीत जेवढ्या जागा तेव्हढेच अर्ज राहिल्याने बिनविरोध झाल्या. तर काही ग्रामपंचायतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला काही अंशी यश तर काही ठिकाणी अपयश आले. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड येथे शेवटच्या काही क्षणात बिनविरोधचा डाव फसला. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी गावासह शेजारील घुल्लेवाडी, मलतवाडी त्याचबरोबर कानडी, मुगळी, धुमडेवाडी, केरवडे ही गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या. तर चिंचणे येथे केवळ एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. 

    बिनविरोधच्या रात्री अनेक खलबत्ते झाली. इच्छुकांना रोखण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न झाले. पण यामध्ये प्रामुख्याने भाऊबंदकी आणि वैयक्तीक वाद आडवे आले आणि निवडणुका लागल्या. गांवनिहाय उमेदवार संख्या पुढीलप्रमाणे- 

    अर्ज दाखल संख्या पुढीलप्रमाणे- माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या बसर्गे येथे ९ जागा, २ बिनविरोध १४ उमेदवार रिंगणात, 

ढोलगरवाडी ७ जागा, बिनविरोध ७, 

मांडेदुर्ग ९ जागा, १ बिनविरोध १९ उमेदवार रिंगणात,  

म्हाळेवाडी ७ जागा,  ७ जागा बिनविरोध, 

मलतवाडी  ९ जागा, ९ बिनविरोध, 

दिंडलकोप ९ जागा - १७ उमेदवार,  

राजगोळी बु. ९ जागा - १९ उमेदवार, 

करेकुंडी ७ जागा-१७ उमेदवार, 

बुक्कीहाळ ७ जागा-८ उमेदवार, 

कळसगादे ७ जागा - १४ उमेदवार, 

पाटणे ७ जागा १२ उमेदवार, 

इब्राहिमपूर ७ जागा, २० उमेदवार, 

कानडी ७ जागा, ७ उमेदवार,  

हजगोळी ९ जागा, २२ उमेदवार, 

माडवळे ९ जागा, २२ उमेदवार, 

जांबरे ५ जागा, १० उमेदवार, 

नागवे ९ जागा, २६ उमेदवार २ जागा बिनविरोध, 

कौलगे ७ जागा, १२ उमेदवार, १ बिनविरोध, 

होसुर ७ जागा १५ उमेदवार, 

शिनोळी खु. ७ जागा, २३ उमेदवार, 

सुरुते ७ जागा, १४ उमेदवार, 

तावरेवाडी ७ जागा, २ रिक्त आणि १० उमेदवार रिंगणात,  

बागीलगे ७ जागा, १३ उमेदवार, १ बिनविरोध,  

नांदवडे ९ जागा - २ बिनविरोध- २७ उमेदवार रिंगणात,  

आसगाव ९ जागा, ३ बिनविरोध, १२ उमेदवार,  

सुंडी ७ जागा, ८ उमेदवार, २ जागा बिनविरोध, १ रिक्त, 

देवरवाडी ९ जागा, २४ उमेदवार, 

दाटे  ११ जागांसाठी २३ उमेदवार, 

तुडये ११ जागांसाठी ३९,  

हलकर्णी  ११ जागा - २१ उमेदवार, 

कालकुंद्री  ११ जागा- २२ उमेदवार, 

कोवाड  ११ जागा, उमेदवार रिंगणात - ३७

धुमडेवाडी ७ जागा, २ रिक्त ५ बिनविरोध,  

बोजुर्डी ७ जागा १७ उमेदवार रिंगणात, 

मुगळी  ९ जागा ९ बिनविरोध, 

किणी ९ जागा, १८ उमेदवार, 

चिंचने ७ जागा, ३ बिनविरोध, १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात, 

केरवडे ७ जागा, ७ उमेदवार, 

पुंद्रा ९ जागा, १३ उमेदवार, ४ बिनविरोध, 

घुलेवाडी ७ जागा, ६ उमेदवार,  

किटवाड ७ जागा, १० उमेदवार, २ बिनविरोध 

कोवाड मधून सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. या ठिकाणी ११ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 


                          ४१ पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध 

धुमडेवाडी, मुगळी, ढोलगरवाडी, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, कानडी, केरवडे, मलतवाडी या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्येएवढेच अर्ज शिल्लक राहिल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.No comments:

Post a Comment