कोवाड ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे स्वप्न अखेर भंगले, अंतर्गत कुरघोडीचा फटका - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2021

कोवाड ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे स्वप्न अखेर भंगले, अंतर्गत कुरघोडीचा फटका



कोवाड / सी एल वृत्तसेवा 

         चंदगड तालुक्याती inल 41 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अनेक गावातील ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आहेत .   कर्यात भागातील मोठी गणली जाणारी कोवाड ग्रामपंचायत एका गटाच्या उमेदवारांच्या अखेरच्या निर्णयामुळे बिनविरोध होता होता राहिली . त्यामूळे कोवाड ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे स्वप्न अखेर आज माघारीच्या दिवशी भंगले .
  30 डिसेंबरच्या अंतिम दिवसापर्यंत तालुक्यातील विक्रमी  65 उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या कोवाड  येथील ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.त्यातच ग्रामपंचायत  बिनविरोध करण्यासाठी  सर्व गटातून प्रयत्न देखील सुरू झाले. गावातील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सर्व गटातील प्रमुखाबरोबरच उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत यशस्वी बिनविरोध करण्याकडे वाटचाल देखील चालू झाली.सर्व गटाना एकत्र आणून त्यावर तोडगा काढण्यात तंटामुक्त समितीला यश सुद्धा मिळाले.सर्वानुमते जागा वाटपाबाबत मार्ग काढण्यात आला. त्यानुसार अतिशय गोपनीय रीतीने कोणताही पक्षपात न करता समितीने योग्य रीतीने जागा वाटपाचा फार्मूला निश्चित करून त्या त्या गट प्रतिनिधींशी चर्चा करून सर्वांचे माघारी अर्जावर सहमती घेतली.त्यानुसार माघारी अर्ज दाखल करण्यासाठी चंदगड तहसील कार्यालय गाठले.परंतु अखेरच्या क्षणी एका गटाच्या उमेदवारांनी माघारी अर्ज दाखल करण्यावर आक्षेप घेतला अन..इथेच सगळा डाव फसला . त्या एका गटामुळे कोवाड ग्रामपंचायत बिनविरोध होण्यात असफल ठरली.अन पुन्हा एकदा कोवाड ग्रामपंचायत कर्यात भागात चर्चेचा विषय ठरली.
   कोवाड परिसरातील मलतवाडी , म्हाळेवाडी,ढोलगरवाडी, घुल्लेवाडी, धुमदेवाडी ह्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत .
 कोवाडचाही तसा प्रयत्न होता . पण अखेरच्या क्षणी तो फसल्याने मतदार याकडे कसे पहातात हे पुढील काही दिवसात निवडणूक निकाला अंती स्पष्ठ होईल.


No comments:

Post a Comment