चंदगड नगरपंचायतीसाठी ५.६५ कोटींचा निधी मंजूर -आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2021

चंदगड नगरपंचायतीसाठी ५.६५ कोटींचा निधी मंजूर -आमदार राजेश पाटील

आमदार राजेश पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

मुंबई येथ नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात नामदार अजितदादा पवार ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी चंदगड नगरपंचायतसाठी भरीव असा निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. शासनाकडून चंदगड नगर पंचायतीला ५ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यानी दिली .

मुंबईत झालेल्या अधिवेशनातील मागणीला अनुसरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीं चंदगड नगरपंचायत करिता साडेपाच कोटींची कामे सूचित करायला सांगितली होती.मागणी केलेल्या कामांसाठी साडे पाच कोटीची कामे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली होती . पाठवलेल्या कामांना आपण लवकरात लवकर मंजुरी करून देण्याची ग्वाही आमदार राजेश पाटील याना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती .

    हा निधी मंजूर झाल्याने संपूर्ण चंदगड नगरपंचायतीचा कायापालट होणार आहे . या निधीतून चंदगड शहराच्या विकासासाठी अगदी अत्यावश्यक सर्व कामे सुचविण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यानी दिली आहे . यामध्ये विशेषतः रस्ते बांधकाम , डांबरीकरण , खडीकरण , कॉक्रिटीकरण , गटर बांधणी , विद्युत दिवे , .शौचालय , स्वागत कमान , स्मशानभूमी नुतनीकरण , शिवस्मारक शुशोभिकरण करणे आदिसाठी ५ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला असल्याची माहितीआमदार राजेश पाटील यानी दिली.
No comments:

Post a Comment