न. भू . पाटील हे शिव शाहू, फुले, आंबेडकरांचे पाईक - प्रा. पी. डी . पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2021

न. भू . पाटील हे शिव शाहू, फुले, आंबेडकरांचे पाईक - प्रा. पी. डी . पाटील

                         प्रा.पी. डी. पाटील न. भु. पाटील प्रतिष्ठन शिवणगे व्यासपीठावरुन संवाद साधताना.

चंदगड / प्रतिनिधी
     शिक्षणाने समाज परिवर्तन होते.तर वाचनाने मन जिवंत राहते,असा विचार घेऊन जगणारे न. भू. पाटील हे खऱ्या अर्थाने शिव शाहू फुले आंबेडकरांचे पायीक ठरतात असे प्रतिपादन न. भू. पाटील यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रमुख वक्ते प्रा पी.डी .पाटील यांनी केले.
     ते पुढे म्हणाले की सत्ता ही समाजपरिवर्तनासाठी असावी विचारावर आधारित राजकारण असावे याच उद्देशाने न .भु . पाटील यांनी राजकारण हे  साध्य नाही तर साधन म्हणून राजकारणाचा वापर केला त्यांनी समाजात जगत असताना उपेक्षितांना जवळ केले त्यांनी आपल्या वर्तनातून  माणूस पण माणुसकीवर ठरते हे दाखवून दिले बंडखोरी केल्याशिवाय समाज परिवर्तन होत नाही ही तीच बंडखोरी त्यांनी समाज सुधारण्यासाठी केली न भू पाटील व र भा माडखोलकर यांच्याकडे दूरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी खेडूत शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची क्रांती चंदगड तालुक्यात घडवून आणली शिक्षणाने माणूस शहाणा होतो म्हणून त्यांनी मंदिरे न बांधता शाळा व वाचनालयाच्या इमारती बांधल्या त्यांनी आपल्या वर्तनातून अंधश्रद्धा निर्मूलन दारूबंदी व अस्पृश्यता निवारणाचे काम केले हे आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून न .भु.पाटील हे द्रष्टा समाजसेवक व समाजाची जाण असणारा महापुरुष होता तसेच समाजाची प्रवृत्ती  बदलण्याचे काम त्यांनी केले त्यांचेच अनुकरण करून मी राजकारण व समाजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक न. भू. पाटील प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. एस. पी.बांदिवडेकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी थोडक्यात न. भू. पाटील व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुरुवातीस डॉ. पी. आर. पाटील यांनी गतवर्षी दिगवंत झालेल्या मान्यवर व्यक्तींचा शोकप्रस्ताव मांडला . पाहुण्यांचा परिचय आर आय पाटील यांनी करून दिला या कार्यक्रमांमध्ये चंदगड तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार न भू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. तसेच नागुबाई धोंडीबा माने माणगाव यांच्या स्मरणात रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक नरसिंगराव पाटील, संचालक दत्तात्रय भुजंगराव पाटील, सौ. बांदिवडेकर, गोपाळ बोकडे, मारुती पवार, शिवाजी तुपारे माजी मुख्याध्यापक कदम हे माजी शिक्षक बसरीकट्टी, डी. डी. पाटील नबु पाटलांची की सर्व आप्तेष्ट मंडळी तसेच खेडूत परिवारातील सर्व व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री ताम्रपर्णी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक याचबरोबर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत पाटील तसेच आभार मुख्याध्यापक डी. जे. पाटील यांनी मांडले . कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे चे सर्व स्टाफ विद्यार्थी यांनी परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment