दुंडगे पुलासाठी निधी देण्याची आमदार राजेश पाटील यांची बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2021

दुंडगे पुलासाठी निधी देण्याची आमदार राजेश पाटील यांची बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे याना दुंडगे पुलासंदर्भात निवेदन देताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी - सी.एल. वृत्तसेवा

     वाहतूक व पाणी अडविण्यासाठी महत्वाचा असलेला व सध्या धोकादायक आलेल्या दुंडगे -कुदनूर ( ता. चंदगड ) येथे नवीन पुलासाठी  भरीव निधी मिळावा अशी मागणी आमदार राजेश पाटील यानी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
       केवळ पाणी अडविण्याच्या उद्देशाने ताम्रपर्णी नदिवर दुंडगे -कुदनूर दरम्यान बांधण्यात आलेला  कोल्हापूर पद्धतीचा बंधारा धोकादायक बनला आहे. दळणवळणासाठी व शेतीला पाणी अडविण्यासाठी महत्वाचा असणाऱ्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबरोबरच नवीन पूल बांधण्यासाठी भरीव निधी  मिळावा अशी मागणी आमदार पाटील यानी मंत्री एकनाथ शिंदे यांचाकडे केली.
           या ठिकाणी नवीन पुलासाठी निधी मिळाल्यास  कर्यात भागातीत शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

No comments:

Post a Comment