कानूर खुर्द येथे श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनाला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

कानूर खुर्द येथे श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनाला प्रारंभ

कानूर खुर्द (ता. चंदगड) येथे श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यक्रमात सहभागी ग्रामस्थ.

चंदगड / प्रतिनिधी

        कानूर खुर्द (ता. चंदगड) येथे श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान संपन्न झाले. संपुर्ण कानूर गावातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा सजीव देखावा व अश्वरथातून ढोल, ताशा, भजन, दिंडीसह श्री रामाचा घोष करत पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. 
राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा सजीव देखावा

सर्व गावात रांगोळी काढून व पूजन करुन स्वागत करण्यात आले. गावात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील ग्रामस्थ उत्फुर्तपणे या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. 1 comment:

Unknown said...

जय श्री राम🙏🙏

Post a Comment