देवरवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

देवरवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

देवरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा 

          देवरवाडी (ता. चंदगड) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि नवीन ग्रामपंचात सदस्याचा सत्कार कार्यक्रम २६ जानेवारी २०२१ निम्मित  करण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून  गावातील रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. देवरवाडी येथील वैजनाथ मंदिराला भरीव निधी देऊन मंदिर परिसराचा विकास करू व पर्यटन व्यवसायाला चालना देणार असेही आमदार पाटील यानी सांगितले. या कार्यक्रमाला परसू पाटील, राजू जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व  गावातील इतर जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment