बॅ. खर्डेकर यांच्याकडून पहिल्या लोकसभेत चंदगडच्या प्रश्नांना प्राधान्य - प्रा. एम. एस. पाटील, होसूर येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांची पुण्यतिथी - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2021

बॅ. खर्डेकर यांच्याकडून पहिल्या लोकसभेत चंदगडच्या प्रश्नांना प्राधान्य - प्रा. एम. एस. पाटील, होसूर येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांची पुण्यतिथी

होसूर : बॅ. खर्डेकर यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी वैजनाथ कालकुंद्रीकर. शेजारी सुबराव पवार आदी.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        स्वातंत्र्योत्तर भारतात  1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान  पंडित जवाहरलाल  नेहरू यांच्या नंतर जे मताधिक्य मिळाले ते  अपक्ष उमेदवार बॅ. खर्डेकर यांना मिळाले होते. त्यांनी पहिल्या लोकसभेत चंदगडकरांचे विविध प्रश्न मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला. न भूतो, न भविष्यती, अशी त्यांची कारकीर्द होती, असे मत होसूर गावचे सुपुत्र व कोल्हापूर येथील डी. डी. शिंदे सरकार ज्युनिअर कॉलेजचे प्रा. एम. एस. पाटील यांनी व्यक्त केले.

     होसूर (ता. चंदगड) येथे मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   बॅ. खर्डेकर यांच्या प्रतिमेला कल्लाप्पा बाळेकुंद्री यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आला.

    व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे लेखापाल सुबराव पवार, शाप्रू  डायस, राजू बाळेकुंद्री, कृष्णा पाटील, नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून बॅ. खर्डेकर यांच्या कार्याविषयी उजाळा दिला.

     यावेळी एस. एल. पाटील, वामन कालकुंद्रिकर, वैजू कालकुंद्रिकर, मारुती बाळेकुंद्री, शिवाजी नाईक, लक्ष्मण राजगोळकर, पांडुरंग सुतार, जकाप्पा सुतार, गणपत सुतार होते. आभार पुंडलिक पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment