आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2021

आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम

 

चंदगड / प्रतिनिधी
         चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी गावाला कै.गुरूनाथ विठ्ठल पाटील (आप्पा) यांच्यापासुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा चालत आला असून,गावचे सरपंच ते आमदार असा प्रवास करणारे माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांचे हे गाव असून ह्या गावची लोकसंख्या ही १५०० असून म्हाळेवाडी ग्रामपंचायत स्थापना सन १९५८ पासून ते आज अखेर निवडणूक लागली नाही. तीच परंपरा आजही कायम ठेवत गावकरी मंडळीनी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध करून सर्वासमोर एक आदर्श घालून दिला आहे. गावकऱ्यांनी बिनविरोध केलेली निवडणूक हीच खरी *कै.आमदार नरसिंगराव साहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मत येथील समर्थकांकडून होत आहे. 

                  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य याप्रमाणे...
१.सी ए पाटील, २.विजय मरणहोळकर, ३.शांता धोंडीबा नांदवडेकर, ४.केदारी (आप्पाजी) गोपाळ पाटील,  ६.कल्पना दिलीप पाटील (बंडूगावडे), ७.अमृता सुधीर कांबळे


No comments:

Post a Comment