२२ जानेवारीला प्रदर्शित होतोय नववर्षातील पहिला मराठी चित्रपट, कला दिग्दर्शक व कलाकार म्हणून चंदगड तालुक्यातील युवकाची भूमिका, कोणता आहे का सिनेमा? वाचा सविस्तर.... - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2021

२२ जानेवारीला प्रदर्शित होतोय नववर्षातील पहिला मराठी चित्रपट, कला दिग्दर्शक व कलाकार म्हणून चंदगड तालुक्यातील युवकाची भूमिका, कोणता आहे का सिनेमा? वाचा सविस्तर....

मुंबई :

         कोट्यावधी रुपये खर्च करुन केवळ स्टोरी चांगली नसल्यामुळे अनेक मराठी सिनेमे आपटले आहेत. त्याउलट कमी बजेट असले तर चांगली स्टोरी असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहाची वाट धरायला लावतात. याच धर्तीवर चांगली स्टोरी असलेला मराठी सिनेमा `पिटर` २२ जानेवारी २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

          चित्रपटाचे कथानक - जीव मग तो प्राण्याचा असला तरी प्रेम, भावना सारख्याच असतात. त्यांना इजा केली तर त्रास आपल्या सारखाच होतो. फक्त त्यांना बोलून दाखवता येत नाही. विरोध करता येत नाही. त्यामुळे मनुष्यप्राण्याच्या पारंपरिक प्रथांना यांचा हकनाक बळी पडतो. अशाच बळी पडलेल्या पिटरची आणी धन्याच्या मैत्रीची भावनिक गोष्ट म्हणजे 'पिटर' २२ जानेवारी २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

या नवीनवर्षात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्या, अशी निर्माता, दिग्दर्शक अमोल अरविंद भावे यांची सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. 

           'आनंदी इंटरप्रायझेस' ची ही पहिली निर्मिती असून सेव्हन कलर्स सिनेव्हिजन आणि हिंदी इंडस्ट्री मधील नामांकित निर्मिती संस्था आणि डिस्ट्रीब्यूशन कंपनी 'जम्पिंग टोमॅटो' हा चित्रपट प्रेझेंट करत आहे. दिप्पांकर रामटेके, प्रितेश किर्तीकुमार शहा आणी रोहनदीप सिंग हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच या चित्रपटाला सुरेल संगीत 'श्री गुरुनाथ श्री' या संगीतकाराने दिले असून गीत लेखनाची जबाबदारी रंगनाथ गजरे, विष्णू थोरे यांनी पार पाडली आहे ही सुंदर गाणी सई जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम या गोड गळ्याच्या गायकांनी गायली आहेत. 

             या चित्रपटाचे छायाचित्रण साऊथचे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर अमोश पुटीयाथील यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन राजेश भालेराव, संकलन किशोर नामदेव, कला दिग्दर्शन रमेश कांबळे उर्फ पुंडलिक कांबळे (हेरे), साऊंड ऋषिकेश मोरे, नृत्य दिग्दर्शक नील कामळे, निर्मिती प्रबंधक भक्ती वरणकर, रंगभूषा आरती बोरसे, वेशभूषा मिलन देसाई, सहायक दिग्दर्शक योगेश मोटे, सुरज मरचंडे, सुरज  पानकडे, राहुल पांचाळ, कलाकार प्रेम बोराडे, मनीषा भोर, सुरेश ढगे, अमोल पानसरे, विनिता संचेती, सिद्धेश सिध्देश्वर, शरद राजगुरू, प्रमेय वाबळे, उमेश पांढरे, मल्हारी ठिकेकर यांनी काम केले आहे. चावंड गावच्या निसर्गरम्य गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मनोरंजन करता करता अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी संपूर्ण टीम ला आशा आहे.

कला दिग्दर्शक व कलाकार रमेश कांबळे (पुंडलिक कांबळे, हेरे, ता. चंदगड)

 निर्माता, दिग्दर्शक अमोल अरविंद भावे व रमेश कांबळे उर्फ पुंडलिक कांबळे (हेरे) या दोघांनी मिळून `आनंदी एंटरप्रायझेस` या बॅनरखाली या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुंडलिक कांबळे यांनी या चित्रपटामध्ये कलाकारीचीही भूमिका बजावली आहे. यामुळे पुंडलिक कांबळे यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. 

                                                                     (माहीती सौजन्य - cinemahalchal.blogspot.com या ब्लॉगवरुन) 




No comments:

Post a Comment