चंदगड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत कधी व कोठे होणार? वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2021

चंदगड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत कधी व कोठे होणार? वाचा सविस्तर

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती, सरपंच आरक्षणाची. चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बुधवार दि. २७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता चंदगड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (तहसिलदार कार्यालयात) येथे होणार आहे. चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे अध्यक्षस्थानी असतील.

       मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणुक नियम 1964 मधील तरतुदीनुसार चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरीकांचा मागास प्रवर्गाचे, महिलांचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पत्राद्वारे आदेश दिला आहे. या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी सर्व गावचे मतदार, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिल कार्यालयाच्या वतीने केले आहे.
No comments:

Post a Comment