कै. साहित्यिक पांडुरंग कुंभार (गुरुजी) |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठान, कोवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने
कांदबरीकार, कथाकार आणि स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार यांच्या स्मृतिपित्यर्थ "वेगळ्या वाटा उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार"* साठी कथासंग्रह मागविणेत येत आहेत. फक्त "कथा संग्रह" या साहित्य प्रकारासाठी हा पुरस्कार दिला जाईल.
*पुरस्काराचे स्वरूप*
१) प्रथम पुरस्कार
५००१ रुपये रोख रक्कम,
सन्मानचिन्ह,
गौरवपत्र
शाल व श्रीफळ
२) द्वितिय पुरस्कार
२००१ रुपये रोख रक्कम
सन्मानचिन्ह,
शाल व श्रीफळ
असे असेल.
पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर साहित्य पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. लेखक किंवा प्रकाशक यांनी *1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020* या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय *दि.15 फेब्रुवारी 2021* पर्यंत पोचतील अशा रितीने खालील पत्यावर पाठविण्याचे आवाहन त्यांच्या चिरंजीव अनंत कुंभार, संजय कुंभार व विनायक कुंभार यांचेमार्फत करण्यात आले आहे.
त्यानंतर सदर आलेल्या कथसंग्रहांमधून निवड झालेल्या कथाकारांना कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण करण्यात येईल त्याची वेळ व ठिकाण हे कळविण्यात येईल.
*पुस्तके पाठवणेचा पत्ता*
अनंत पांडूरंग कुंभार
संजय पांडूरंग कुंभार
विनायक पांडूरंग कुंभार
रणजित नगर , मु.पो. कोवाड
ता.चंदगड जि. कोल्हापूर
पिन कोड नं.416508
संपर्क - मोबाईल
8975324949
9420355794
9403109477
No comments:
Post a Comment