विकास कामामध्ये कधीही मागे राहणार नाही - जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2021

विकास कामामध्ये कधीही मागे राहणार नाही - जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण

 

रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य कलाप्पा भोगण व इतर.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       विविध पदे कोणालाही मिळतात. पण मिळालेल्या पदांचा वापर समाजाच्या विकासासाठी होणे गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकास कामे चालू आहेत. भविष्यात अशा विकास कामासाठी जराही कमी पडणार नसल्याचे आश्वासन विचार जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांनी दिले.

        निटूर पाझर तलावाजवळ असणाऱ्या स्वामी विवेकानंद इंग्लीश मेडिअम स्कूलकडे जाणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्री. भोगण बोलत होते. रस्ता डांबरीकरण करून विद्यार्थी वर्गाची सोय करून दिलेले वचन पाळल्याबद्दल कल्लापा भोगण यांचा सत्कार इंग्लीश मेडिअम स्कूलचे संस्थापक डॉ. प्रविण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        या कार्यक्रमाला प्रा. गुरूनाथ पाटील,  नारायण कणुकले, पुंडलिक जाधव, रामचंद्र व्हन्याळकर आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत श्रीकांत सुळेभावकर यांनी केले. आभार डॉ. प्रविण पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment