कोल्हा व अस्वलाच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई, आमदारांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

कोल्हा व अस्वलाच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई, आमदारांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश प्रदान


कोल्हा व अस्वलाच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्यांना आमदारांच्या हस्ते भरपाईचे धनादेश प्रदान करण्यात आले.

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पुंडलिक जकनू गावडे (रा जेलूगडे) हे अस्वलाच्या व सौ बसव्वा बच्चाप्पा बच्चेनहट्टी (रा बूक्कीहाळ)या कोल्ह्यच्या  हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही शेतकऱ्यांना वनविभागाच्या वतीने आम.राजेश पाटील यांच्या हस्ते एक लाख पंचवीस हजार रूपये मदतीचा धनादेश देण्यात आले.

              पुंडलिक गावडे हे 13 नोव्हेंबर 2020 जनावरे चारण्यासाठी जंगलानजीक असलेल्या माणी नावाच्या शेतात गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झुडुपात बसलेल्या अस्वलाने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला अस्वलाने ओरबाडून गावडे याना रक्तबंबाळ केले होते,तर बसव्वा बच्चेनहट्टी हि महिला सप्टेंबर 2020 रोजी गावाशेजरील शेताकडे कामाला गेली असता कोल्ह्याने हल्ला करून जखमी केले होते.वनविभागाने या दोघा जखमीना आज आम राजेश पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी आर भांडकोळी , जि.एम होगाडे , वनरक्षक एस एस जितकर , एम आय सनदी , एस बी तांबेकर , जी पी वळवी , डि ए कदम , एम एम हुल्ले , डि एस रावळेवाड , एस एस बोंद्रे , वनकर्मचारी चंद्रकांत बांदेकर व विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते .
    

No comments:

Post a Comment