शिनोळीतील तो ' बिबट्या मुळ अधिवासात? म्हणजे कोठे वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

शिनोळीतील तो ' बिबट्या मुळ अधिवासात? म्हणजे कोठे वाचा सविस्तर


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

दोन दिवसांपूर्वी शिनोळी बेळगुंदी या दरम्यानच्या शिवारात दर्शन झालेला बिबट्या गत दोन दिवसात त्याची चाहूल नसल्याने तो मूळ अधिवासात धामणे (ता. बेळगाव) या जंगलात गेला असावा, असा अंदाज पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी व्यक्त केला. सदर बिबट्याने गत दोन दिवसात कोठेही नुकसान वा हल्ला केलेला नाही. धामणे परिसरामध्ये लांडोर व ससे यांचे प्रमाण मोठे असल्याने त्याला पुरेसे खाद्य आहे. त्यामुळे तो पाळीव प्राण्यावर हल्ला करणार नाही, असाही अंदाज क्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान बेळगुंदी व शीनोळी या सीमेवरील गावात शेतकऱ्यांमधून वनपथक जागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment