चंदगड मराठी अध्यापक संघामार्फत राज्यस्तरीय उखाणा स्पर्धाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

चंदगड मराठी अध्यापक संघामार्फत राज्यस्तरीय उखाणा स्पर्धाचे आयोजन

 


चंदगड - सी .एल. वृत्तसेवा

कोणतेही शुभकार्य असो त्यात नव्या नवरी पासून ते प्रत्येक सुवासिनीला आग्रह केला जातो तो उखाण्याचा. मराठी संस्कृती, मराठी भाषेच्या प्रेमापोटी मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला अशा दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटातील पहिल्या पाच कमांकाना संघामार्फत मराठी राजभाषा दिना दिवशी ( २७ फेब्रुवारी ) गौरविण्यात येणार आहे. दि.१५ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त दोन मिनिटींचा उखाण्याचा व्हिडीओ ९४२०९७३१५१ या हॉट्सअप नंबरवर पाठविण्याचे आवाहन संघाचे सचिव एस.पी. पाटील यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment