चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज


   चंदगड / प्रतिनिधी

शुक्रवारी होणा-या चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार विनोद रणावरे यांनी दिली.

      चंदगड तालुक्यातील ४१ग्रामपंचायतीच्या निवडणुकां पैकी आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी सह धुमडेवाडी, मलतवाडी, ढोलगरवाडी, केरवडे, मूगळी, कानडी, घुल्लेवाडी या गावातील निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १०१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ३३९जागांपैकी ८७ जागा बिनविरोध निवडुन आल्या आहेत. उर्वरित  २५२ जागा साठी निवडणूक होत आहे. 

    प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, असणार आहे. मतदान केंद्रावर सर्व साहित्य व कर्मचारी पोहोचले आहेत.आज १५ रोजी मतदान होणार आहे तर १८ तारखेला चंदगड येथे मतमोजणी होणार आहे.No comments:

Post a Comment