मांडेदुर्ग येथे दूध डेअरी सेक्रेटरी, पतसंस्था मॅनेजर, शिक्षक, होमगार्ड यांची प्रतिष्ठा पणाला - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

मांडेदुर्ग येथे दूध डेअरी सेक्रेटरी, पतसंस्था मॅनेजर, शिक्षक, होमगार्ड यांची प्रतिष्ठा पणाला

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे ग्राम पंचायत निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निवडणुकीत दूध डेअरीचे सेक्रेटरी, शिक्षक, पतसंस्थेचे मॅनेजर, होमगार्ड रिंगणात असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  एकूण सात जागांसाठी ही निवडणूक होत असून वार्ड क्रमांक एक मध्ये खुल्या गटातील महिलांसाठी दोन जागा, ओबीसी पुरुष साठी एक जागा, वार्ड क्रमांक दोन मध्ये जागा तीन असून एक रिक्त असून दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी आहेत. तर वार्ड क्रमांक 3 मध्ये दोन ओपन पुरुष व एक इतर अशा प्रकारे सात जागांसाठी मतदान होणार आहे. 

गुरुवारी दि. १५ रोजी मतदान होणार आहे.   गावातील नवक्रांती दूध संस्थेचे सेक्रेटरी गणपत पोवार, कोवा ड येथील अभय पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी पाटील, आंबेवाडी येथील शिक्षक भरमा पाटील, होमगार्ड बाळू कृष्णा पाटील हे आपले नशीब आजमावत आहेत. याशिवाय अन्य उमेदवार रिंगणात आहेत. उद्या मतदान होत असून या निकालाकडे परिसराचे लक्ष लागून आहे.चार महिला व तीन पुरुष उमेदवार निवडून द्यावयाच्या आहेत त्यासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत.
No comments:

Post a Comment