हिंडगाव प्राथमिक शाळेतून टीव्ही संचाची चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2021

हिंडगाव प्राथमिक शाळेतून टीव्ही संचाची चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा


चंदगड / प्रतिनिधी

          हिंडगाव (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदीर येथून अज्ञात चोरट्याने इंटेक्स कंपनीचा ३२०१ मॉडेलचा स्मार्ट टीव्ही संच चोरून नेला आहे. २६ डिसेंबर २०२० ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान हि चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार हिंडगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोकीतकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. हा टीव्ही संच हिंडगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला भेट दिला होता. हा टीव्ही इयत्ता सहावीच्या वर्गखोलीत लावण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्याने याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील टीव्ही संचाची चोरी केली आहे. या टीव्ही संचाची ४ हजार रुपये किंमत आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॉ. श्री. नांगरे करत आहेत. 





No comments:

Post a Comment