कालकुंद्री येथील प्रथम पाटील आला प्रथम, कोणत्या क्रिडा प्रकारात, वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2021

कालकुंद्री येथील प्रथम पाटील आला प्रथम, कोणत्या क्रिडा प्रकारात, वाचा सविस्तर

प्रथम पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हा थेलिटीक्स असोसिएशन मार्फत कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या दोन हजार मीटर धावणे स्पर्धेत कालकुंद्री येथील प्रथम पांडुरंग पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. तो सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे नववीत शिकत आहे. त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी त्याचे अभिनंदन केले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला  क्रीडा शिक्षक एन. जे. बाचूळकर व ई. एल. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment