जीवनातील संकटाना धैर्याने तोंड देत जीवन जगता आले पाहिजेत - सदाशिव देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2021

जीवनातील संकटाना धैर्याने तोंड देत जीवन जगता आले पाहिजेत - सदाशिव देसाई

 

मदत वाटप कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर

चंदगड / प्रतिनिधी 

माणसाच्या जीवनात अनेक संकटांची वादळ येत असतात पण आपण या संकटाशी धैर्याने सामना करून जीवन जगता आले पाहिजे. यासाठी नेहमी सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहिल्यास जीवन अधिक सुंदर होते असे मत सदाशिव देसाई यांनी व्यक्त केले .कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोरोणा काळात मयत सभासदांच्या वारसांना मदत धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी कोवाड येथे बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्हि.वाय. कांबळे हे होते .


माणसाचे जीवन हे अनेक खाचखळग्यांनी भरलेल्या आहे .कधी सुखाचे तर कधी दुःखाचे डोंगर येत असतात .येणारी संकटे ही आपल्या जीवनात वेगळं काहीतरी निर्माण करण्यासाठी येत असतात. त्याकडे आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन कोण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास जीवन अधिक सुंदर होते .यासाठी स्वतःचे धैर्य खचू देऊ नका असे मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेचे शाखा कोवाडचे चेअरमन सदाशिव देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी कोरोणा काळात मयत सभासदांचे वारस श्रीमती माधुरी पुंडलिक गावडे,श्रीमती संजीवनी संजय शिवणगेकर ,श्रीमती संगिता प्रमोद पाटील या वारसांना संस्थेच्या वतीने सभासद कल्याण निधीतून धनादेश वाटप करण्यात आला. यावेळी श्रीराम विध्यालय व श्रीमान व्हि.पी .देसाई ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्हि.वाय. कांबळे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी आनंत भोगण, धनाजी गुरव ,दिलीप जाधव, संदीप शिंदे ,गजानन पाटील यांच्यासह मयत सभासदांचे नातेवाईक उपस्थित होते.No comments:

Post a Comment