बजाज इंडिया फायनान्स कंपनीचे सहा लाखाचे लोन देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणुक, वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2021

बजाज इंडिया फायनान्स कंपनीचे सहा लाखाचे लोन देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणुक, वाचा सविस्तर

चंदगड / प्रतिनिधी

       बजाज इंडिया फायनान्स कंपनीचे सहा लाखाचो लोन देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणुक झाली आहे. याबाबत संशयित सात जणांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. अमोल रमेश राजवैध (कनिष्ठ लिपीक, दिवाणी न्यायालय, चंदगड, मुळ गाव रा. शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा, सद्या रा. विनायगर नगर चंदगड) यांनी ही तक्रार पोलिसात दिली आहे. १६ सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान मुदतीत हि घटना घडली आहे. 

        यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - फिर्यादी अमोल राजवैध हे चंदगड येथील दिवाणी न्यायालयात कनिष्ठ लिपीक म्हणून कामाला आहेत. अमोल यांना ६ लाख २९ हजार ८०० रुपयांचे कर्ज ३ ट्कके दराने मंजूर करुन देतो असे अमिष दाखवले. यासाठी वेळोवेळी मोबाईलवर संदेश पाठवून व संभाषण करुन व्हॉट्अप कॉल करुन अमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडून बँक आफ इंडिया चंदगड शाखेतील बचत खात्यातून भरुन घेवून फिर्यादीला कर्ज मंजुर न करता संशयित प्रियांका व खुशी नावाची महिला, निरज गुप्ता, अभिषेक, कोमल शर्मा, पंकज टेंडा, रुद्रप्रताप (सर्व पत्ता – बजाज इंडिया फायनान्स, १५३०८, कार्पोरेट ऑफिस, बी-११, पहिला मजला, सेक्टर १६, वर्धमान प्लाझा, ब्यु डॉर्ट ऑफिसचे वरती, मेट्रोस्टेशनचे विरुध्द नोएडा उत्तर प्रदेश पिन क्र. २०१३०१) यांनी फिर्यांदी यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. त्यामुळे बजाज इंडिया फायनान्स कंपनीतील वरील ७ जणांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॉ. श्री. नांगरे तपास करत आहेत.
No comments:

Post a Comment