कोवाड महाविद्यालयाला नॅक समितीकडून `बी प्लस` मानांकन - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2021

कोवाड महाविद्यालयाला नॅक समितीकडून `बी प्लस` मानांकन

नॅक समितीकडून अंतिम अहवालाची प्रत स्वीकारताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ व्ही.आर.पाटील

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा 

          सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाडचे  (थर्ड सायकल ) पुनर्मूल्यांकन  दि.१८  जाने. २०२१ ते १९ जाने. २०२१ या कालावधीत   तपासणी झाली.  या पूर्वी महाविद्यालयाला  बी   हे मानांकन प्राप्त झाले होते. आताचे हे  तिसरे मूल्यांकन  झाले आहे. त्याचे बी प्लस  मानांकन प्राप्त झाले आहे.
         या समितीमध्ये तपासणी  करण्यासाठी  आदिकवी नन्नया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश वर्मा पेनुमत्सा (चेअरमन) डॉ. संजीत कुमार (को-ऑर्डिनेटर) गुप्ता प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स दिन दयाळ उपाध्याय गोरखपुर विद्यापीठ गोरखपूर युपी डॉ. जावेद अहमद काझी (सदस्य) ही, त्री  सदशिय समिती NAAC बेंगलोर या संस्थेने गठित केली होती. या तज्ञ समिती मार्फत महाविद्यालयातील सर्व विभागाची तपासणी केली. त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, बी. सी. ए. आणि सायन्स सर्व विद्याशाखा, विभाग, सर्व समितीचे उपक्रम, प्रशासकीय कामकाज, क्रीडा, एन. एस. एस, ग्रंथालय, सर्व सायन्स विभागाच्या लब, संगणक विभाग, बागबगीच्या, रेन हार्वेस्टिंग प्लॅन्ट, कॅन्टीन, आजी, माजी विध्यार्थी, पालक, समाजातील घटक, संस्था प्रतिनिधी, वेस्ट मॅनेजमेंट, महिला, विद्यार्थी,  प्राध्यापक स्वचछतागृह, स्टाफ रूम, सर्व विभागांचे उपक्रम, आयसीटी,रूम, इंटरनेट, वाय फाय सुविधा, ऑफिस, कामकाज, आणि इतर सर्व सुविधा ऑफिस कामकाज संस्थेचे कार्य याची पाहणी करून विविध उपक्रमांची माहिती घेण्याबरोबरच ५ वर्षातील सर्व विभागातील कामकाजाची तपासणी केली आहे. 
     २०१४-१५ ते २०१८-१९ कालावधीतील विविध पातळीवर  महाविद्यालयाची गुणवत्ता `बी प्लस` मानांकन प्राप्त करून  कायम राखली  आहे. ही बाब संस्थेसाठी खूप गौरवास्पद आहे. संस्थाध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, संस्था सचिव एम. व्ही. पाटील आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील महाविद्यालयातील NAAC कॉर्डिनेटर डॉ. ए. एस. आरबोळे तसेच सर्व विद्याशाखांचे प्रमुख समितीचे प्रमुख सदस्य तसेच प्रशासकीय सेवकांनी आपापली जबाबदारी  पूर्णपणे पर पाडली आहे.  या यशात समाजातील प्रत्येकाचे खूप सहकार्य मिळाले आहे. या यशात समजातील सर्व घटक, आजी, माजी, विद्यार्थी, पालक, संस्था, संचालक, पदाधिका्री,सभासद,यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हे पुनर्मूल्यांकन कोविड् 19 चे  शासनाने वेळोवेळी निर्गमित  केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून केले आहे.

No comments:

Post a Comment