महागावात 'एस. जी. एम. डायग्नोस्टिक 'सेंटरचे उद्घाटन, केशरी रेशनकार्ड धारकानाही मिळणार अल्प दरातील सुविधा - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2021

महागावात 'एस. जी. एम. डायग्नोस्टिक 'सेंटरचे उद्घाटन, केशरी रेशनकार्ड धारकानाही मिळणार अल्प दरातील सुविधा

                         

चंदगड / प्रतिनिधी

        महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हाँस्पिटलने सूरू केलेल्या अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटरचे उद्धाटन  संस्थाध्यक्ष  ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

           या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये  तपासणी साठी येणाऱ्या पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकाना संस्थास्तरावर अल्प दरात तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांला माफक दरात उच्च दर्जाच्या  चाचण्या करण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे.

            या सेंटरमधून जी. ई. ॲडव्हान्स 16/32 स्लाईसद्वारे सी. टी. स्कॅन, कोलोनोस्कोपी, कलर पलर, ल्पोस्कोपी, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, डिजीटल एक्सरे, इंडस्कोपी, अद्ययावत पॅथॉलॉजी लॅबची सुविधा मिळणार आहे. 

            यासाठी चोवीस तास अनुभवी कर्मचारी, टेक्निशियन कार्यरत असणार आहेत. सामान्य रुग्णालाही आधार देऊन संस्थास्तरावर केशरी व पिवळ्या रेशनकार्डवर अल्प दरात उच्च दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध असल्याने या सुविधाचा लाभ या विभागातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन केले. यशवंत चव्हाण यांनी केले आहे. 

            यावेळी डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सचिव डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण व इतर डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment