सडेगूडवळेच्या कुस्ती मैदानात सागर मोहोळकर गद्देलोट डावावर विजयी, नॅशनल चॅम्पियन पै.पृथ्वीराज वर मात - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2021

सडेगूडवळेच्या कुस्ती मैदानात सागर मोहोळकर गद्देलोट डावावर विजयी, नॅशनल चॅम्पियन पै.पृथ्वीराज वर मात

सडेगूडवळे ता चंदगड येथील कुस्ती आखाड्यात पै.पृथ्वीराज पाटील व पै.सागर मोहोळकर यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर, नाना पवार,पै.राम पवार व इतर 

चंदगड / प्रतिनिधी: (नंदकुमार ढेरे ) 

        सडेगूडवळे (ता. चंदगड) येथील रामलिंग यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन पै सागर मोहोळकर याने गद्देलोट डावावर नॅशनल चॅम्पियन पै पृथ्वीराज पाटील याच्या वर मात करून प्रथम क्रमांकाचे एक्कावन हजार रूपयांचे जिंकले. या नंतर झालेल्या कुस्त्यामध्थे पै.संदीप पाटील, पै.विक्रम मोरे,पै गौतम शिंदे, पै आकाश यळ्ळूरकर,,पै संतोष अथणी, पै अभिषेक अंधारे ,पै मारूती धारवाड ,पै रवि पाटील पै.विनायक ओऊळकर, पै ओम घाडी,पै अमृत पाटील, पै नरेश इटगी आदी पैलवाना सह महिला पैलवान पै रक्षिता सूर्यवंशी, पै.शालीना सिध्दी,पै. ॠतूजा गूरव यांनीही  विजय मिळवले.

प्रथम क्रमांकांच्या कुस्तीतील अटीतटीच्य एक क्षण

          चंदगड तालुक्याच्या कोकण भागात महाराष्ट्र राज्य  कुस्ती परिषद व कोल्हापूर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय पंच पै राम पवार व महाराष्ट्र केसरी पै विष्णूपंत जोशीलकर,पै.रामदास देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत चटकदार पन्नास महिला व पुरुषांच्या  निकाली कुस्त्या झाल्या.पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कसह सामाजिक अंतर राखत महिला व पुरुष प्रेक्षकांनीही हजेरी लावली होती. कुस्ती आखाड्याचे उद्धाटन पै विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रथम क्रमांकाची कुस्ती माजी मंत्री भरमुआण्णा पाटील व भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.

यावेळी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी चंदगड च्या लाल मातीतून महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर यांच्यासारखा हिरा निर्माण झाला. ज्यांच्यामुळे चंदगड चे नाव देशभर प्रसिद्ध झाले.शिवाजीराव पाटील यानी कुस्ती ची परंपरा टिकवण्यासाठी यूवकांनी पुढाकार घेतला पाहिजे,शासनस्तरावर चंदगड तालुक्यात भरणार्या कुस्ती आखाड्याना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. पै विष्णू जोशीलकर यानी तांबड्या मातीत घाम गाळलेले वाया जात नाही.घामातून सोने रूपी पैलवान तयार होतात. सूत्रसंचालन कृष्णा चौगुले यांनी केले. 

प्रथम क्रमांकांची कुस्ती जिंकल्या नंतर पै सागर मोहोळकर याला समर्थकांनी उचलून मैदानाभोवती फेरी मारली.

  कोकणच्या तांबड्या मातीत कोरोनानंतर पहिल्यांदाच सडेगूडवळे येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने यूवानेते प्रकाश पाटील यानी कुस्ती मैदान भरवून मैदानी खेळापासून दूर जात असलेल्या यूवकांना दिशा देण्याचे काम केले आहे. याबद्दल मान्यवरांनी प्रकाश पाटील यांचे कौतुक केले. 


No comments:

Post a Comment