उत्साळी गावात पाणीटंचाई, ग्रामस्थांचे आमदार राजेश पाटील यांना निवेदन, आमदारांनी काय दिल्या प्रशासनाला सुचना? वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

उत्साळी गावात पाणीटंचाई, ग्रामस्थांचे आमदार राजेश पाटील यांना निवेदन, आमदारांनी काय दिल्या प्रशासनाला सुचना? वाचा सविस्तर

उत्साळीच्या जॅकवेलची पहाणी करताना अभियंता श्री सावळगी व ग्रामस्थ

अडकूर - सी. एल. वृत्तसेवा

           येथूनच जवळ असलेल्या उत्साळी (ता. चंदगड) येथे  पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून ग्रामस्थानी यासंदर्भात आमदार राजेश पाटील याना निवेदन दिले असून आमदार पाटील यानी तात्काळ या संदर्भात प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.

                                             खासगी बोअरवेलचे पाणी भरताना महिला

           उत्साळीला जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा होतो. पण सध्या ही जॅकवेल गाळाने भरली असल्याने पाणीपुरवठा अस्वच्छ व अपूरा होत आहे. सध्या तर एक ते दोन दिवसातून एकदा पाणी पूरवठा केला जात आहे. घटप्रभा नदिकाठावर असलेल्या उत्साळीला पाणी टंचाई म्हणजे `'नदि उशाला आणि कोरड घषाला`` अशी अवस्था येथे झाली आहे. येथील ग्रामस्थ संतोष सखाराम देसाई, युवराज कदम, प्रदिप देसाई ग्रामस्थांना पाणीपुरवठा करत आहेत. सध्या मात्र येथे पाणीटंचाई असून हा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

        आमदार राजेश पाटील यांच्या आदेशाने प्रशासनाकडून पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री. सावळगी  यांनी गावाला भेट दिली. जॅकवेलची पहाणी करून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. 
No comments:

Post a Comment