![]() |
सुनिल काणेकर |
चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुनील सुभाष काणेकर यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात देश, विदेशांतील २५ जणांचा या पदवीने सन्मान झाला. सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान विचारात घेऊन या पदवीने सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या कालावधीत प्रत्यक्ष कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन त्यांनी योगमुद्राच्या सहाय्याने कोरोना बाधितांना आश्वासित केले. घरोघरी भेटी देऊन मानसिक आधार देण्याचे काम केले. आयुवेदिक काढ्याचे वाटप केले. शहर परिसरातील गोरगरिबांच्या अडीअडणीत मदतीला धावून जाणे, रुग्णांच्या मदतीला पडणे, औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्यासारख्या कामातून त्यांनी आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली.
No comments:
Post a Comment