मुख्याद्यापक आर. आय. पाटील यांना आदर्श मुख्याद्यापक पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

मुख्याद्यापक आर. आय. पाटील यांना आदर्श मुख्याद्यापक पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आदर्श मुख्याद्यापक पुरस्कार स्विकारताना आर. आर. पाटील व इतर.

चंदगड / प्रतिनिधी 

      जेष्ठ शिक्षणतञ्ज्ञ डी. बी. पाटील विचारमंच या राज्यस्तरीय संघटनेचा आदर्श मुख्याद्यापक पुरस्कार दि. न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्यू. कॉलेजचे प्राचार्य. आर. आय. पाटील यांना मिळाला. शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
       यावेळी  पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आम. छत्रपती मालोजीराजे, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यासह खेडूतचे सचिव प्रा. आर. पी. पाटील, सौ. व्ही. आर. बांदिवडेकर, एस. जी. सातवणेकर, टी. एस. चांदेकर, एम. एल. कांबळे, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील आदी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment