बेळगाव येथील सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन, रॅलीत कर्नाटक सरकारची दडपशाही, महाराष्ट्र सरकारने ठोस निर्णय घेण्याची मराठी भाषिक बांधवांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

बेळगाव येथील सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन, रॅलीत कर्नाटक सरकारची दडपशाही, महाराष्ट्र सरकारने ठोस निर्णय घेण्याची मराठी भाषिक बांधवांची मागणी

रॅलीत सहभागी झालेले सीमाबांधव

चंदगड (राजेंद्र शिवणगेकर)   

         दर वर्षी 17 जानेवारी रोजी कर्नाटकातील बेळगाव येथील सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्याना पदयात्रा काढून कर्नाटक सरकारचा निषेध करत रॅली काढून अभिवादन केले जाते. मात्र यावर्षी भाजपाध्यक्ष व केंद्राचे गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेच्या पोटनिवडणुक प्रचारासाठी बेळगाव येथे येत असल्याचे कारण दाखवून नेहमीच्या प्रचार मार्गात कर्नाटक सरकारने दडपशाही करून पर्यायी मार्गाने रॅली काढण्यात मराठा बांधवांना सक्ती केली.

          17 जानेवारी 1956 रोजी सीमा लढ्यात हुतात्मे पत्करलेल्या व्यक्तींना दरवर्षी बेळगावातील सीमा बांधव हुतात्माना अभिवादन करून प्रचार रॅली काढून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत असतात. यावर्षी या रॅलीत कर्नाटक सरकारने दडपशाही आणून पर्यायी मार्गाने रॅली काढण्यासाठी सीमा बांधवांना शक्ती केली .भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या लोकसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज बेळगावात येत असल्याचे निमित्त करून मराठी बांधवांच्या वर कर्नाटक सरकारनेही दडपशाही केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज  भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट नाकारल्याने आज सीमा बंधवाने मोठ्या जोषाने बेळगाव, कारवार, बिदर ,निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगाव चा परिसर दणाणून सोडला. 


      दर वर्षी 17 जानेवारी हा दिन बेळगावात सीमा लढ्यात  हुतात्मा पत्करलेल्या व्यक्तींना अभिवादन केले जाते. या दिवशी कर्नाटक सरकारच्या विरोधात पदयात्रा काढून निषेध व्यक्त केला जातो. केंद्रीय गृहमंत्री आज बेळगाव दौऱ्यावर येत असल्याने बेळगाव येथे भव्य सभामंडप उभारण्यात आला असून संध्याकाळी ही प्रचार सभा होणार आहे .या प्रचार सभेचे निमित्त करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक व मराठी बांधव या रॅलीत दरवर्षी सहभागी होत असतात .मात्र आज कर्नाटक सीमा नाक्यावरच या बांधवांना रोखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना या रॅलीत सहभागी होता आले नाही. 

       कर्नाटक राज्यातील 865 गावे ही महाराष्ट्रात येण्यासाठी गेली कित्येक वर्ष वाट पाहत आहेत. मात्र कर्नाटक सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे येथील मराठी बांधवांची गळचेपी होत आहे. हा अन्याय गेले कित्येक वर्षे ते सहन करत आहेत वेळोवेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी मराठी बांधव याठिकाणी या दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे हा अन्याय त्यांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकार विरुद्ध ठोस पावले उचलावीत अशी मागणी सीमाभागातील मराठी बांधवांच्या कडून होत आहे.
No comments:

Post a Comment