कोवाड महाविद्यालयाचे १८ व १९ जानेवारीला होणार पुनर्मूल्यांकन, महाविद्यालय सज्ज - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

कोवाड महाविद्यालयाचे १८ व १९ जानेवारीला होणार पुनर्मूल्यांकन, महाविद्यालय सज्ज


कोवाड /सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड चे पुनर्मूल्यांकन साठी दिनांक 18 जानेवारी २०२१ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत महाविद्यालयाचे तपासणीसाठी येत आहे.

यापूर्वी या महाविद्यालयाला बी प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झालेले आहे. आता महाविद्यालय तिसऱ्या मूल्यांकनासाठी सज्ज झाले आहे. हे मूल्यांकन करण्यासाठी आदिकवी नन्नया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश वर्मा पेनुमत्सा..(चेअरमन) डॉ. संजीत कुमार (को-ऑर्डिनेटर) गुप्ता प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स दिन दयाळ उपाध्याय गोरखपुर विद्यापीठ गोरखपूर युपी. डॉ.जावेद अहमद काझी (सदस्य )ही त्रि सदसिय समिती NAAC संस्थेने गठित केली आहे.या तज्ञ समिती मार्फत महा विद्यालयाचे पुनर्मूल्यांकन होणार आहे. त्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग सज्ज आहेत.प्राथमिक सुविधांपासून ते गुणवत्ता तपासणी करून माजी विद्यार्थी-पालक समाजातील विविध घटक त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाणार आहे. हे मूल्यांकन दोन दिवस दी.१८ जानेवारी २०२१ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत होत आहे यामागील ५ वर्षातील सर्व विभागातील कामकाजाची तपासणी करणार आहे. २०१४-१५ ते २०१९-२० कालावधीतील विविध पातळीवर संस्था महाविद्यालय महाविद्यालयातील सर्व विद्याशाखा तसेच विविध विभागांची, तपासणी करण्यासाठी ( पुनर्मूल्यांकनासाठी) शैक्षणिक ,. गुणवत्ता तपासली जाणार आहे..

त्यासाठी संस्थेने विविध पातळीवर सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. संस्थाध्यक्ष डॉ. ए.एस. जांभळे , संस्था सचिव एम ,व्ही. पाटील याच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील महाविद्यालयातील NAAC कॉर्डिनेटर डॉ. ए. एस. आरबोले. तसेच सर्व विद्याशाखांचे प्रमुख समितीचे प्रमुख सदस्य. तसेच प्रशासकीय सेवकांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. .कोविड १९ चे शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून महाविद्यालय मूल्यांकनासाठी सज्ज झाले आहे. 



फोटो- कोवाड ता चंदगड येथील महाविद्यालय

No comments:

Post a Comment