स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत प्रथम, कोणती आहे ही ग्रामपंचायत? वाचा सविस्तर........... - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2021

स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत प्रथम, कोणती आहे ही ग्रामपंचायत? वाचा सविस्तर...........

स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर प्रमाणपत्र स्विकारताना लक्कीकट्टेचे ग्रामस्थ.

चंदगड / प्रतिनिधी

       लकीकट्टे (ता. चंदगड) येथील  ग्रामपचायतीने सन २०१ ९ / २०२० सालामध्ये आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेमध्येत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.  

         जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहातसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण वैदयकीय शिक्षण राज्य मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचे शुभ हस्ते जि. प. चे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, अति.मुख्यकार्यकारी अधिकारीअजय कुमार माने, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रविण यादव, महिलाबालकल्याण सभापती डाॅ. पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती सौ. स्वाती सासणे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, सौ. प्रियदर्शनी मोरे  यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

     ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळा सी.सी टिव्ही बसवणे, १०० % शौचालाय वापर, शाळा अंगणवाडी शौचालय, शुद्ध पाणी पुरवठा, १०० % घरांना नळ जोडणी, सांडपाणी परसबाग, शेतीसाठी वापर, घन कचरा व्यवस्थापन स्मशानभूमी सुशोभिकरण, वृक्ष लागवड , क्रीडांगण, लसीकरण, साथ रोग उपाययोजना विद्यार्थी गळती प्रमाण रोखणे, नरेगा अंतर्गत घरकुले पाणंद रस्ता, शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे, बचत गट महिलांचा सहभाग, ९ ६ % कोरोना काळात वसुली, नियमित विद्युत देयके भरणे लेखाशक पूर्तता, सामाजिक दायित्व, आंतरजातीय विवाह सोहळा, घरगुती LED बल्ब वापर, बायोगॅस लोक सहभागातील विकास कामे, आपले सरकार आज्ञावली अद्यावत. १४ वा वित्त आयोग पूर्ण कामे, अद्यावत रेकॉर्ड या सर्व उल्लेखनिय कार्याबद्दल गटविकास अधिकारी. चंद्रकांत बोडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देवून सरपंच सौ. रेश्मा गणपती कांबळे, उपसरपंच विलास लक्ष्मण रेडेकर व ग्रामसेवक श्रीधर भोगण यांना गौरविण्यात आले.

         या कामी सभापती  ॲड. अनंत कांबळे, जि. प. कल्लाप्पाणा भोगण, उपसभापती  सौ. मनिषा शिवणगेकर, सहा.गट विकास अधिकारी संतोष जाधव, विस्तार अधिकारी बी. एम्. कांबळे, सुरेश ठोंबरे, सुरेश आळंदे, दयानंद मोटुरे, विलास थोरवत, जयवंत खोत, दयानंद रेडेकर, बाजीराव खराडे, मधुकर सुतार, मोहन जाधव, शामराव  रेडेकर, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा व सर्व ग्रामस्थ लकीकट्टे यांचे सहकार्य मिळाले. पुरस्कार वितरणावेळी ग्रा. प. सदस्य मनोहर कांबळे, सौ. सुधा पाटील, सौ. रेणुका रेडेकर, सौ. गीता सुतार, पोलिस पाटील दयानंद कांबळे,  सौ. मंदाकिनी देसाई, बाळू कांबळे, चाळोबा कांबळे उपस्थित होते.




No comments:

Post a Comment