कोवाड केंद्रांतर्गत शिवजयंती उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2021

कोवाड केंद्रांतर्गत शिवजयंती उत्साहात संपन्न

                               जयप्रकाश विद्यालयात प्रतिमा पूजन करताना मुख्याध्यापक व शिक्षक.


कोवाड : प्रतिनिधी 

        केंद्रीय शाळा समूह कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत प्राथमिक माध्यमिक शाळांत रयतेचा राजा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 

       केंद्र शाळेत मुख्याध्यापक श्रीकांत वै पाटील यांच्या हस्ते, तेऊरवाडी शाळेत मुख्याध्यापिका प्रेमिला बामणे, विमं. चिंचणे येथे प्रकाश नांदुडकर, छ. शिवाजी वि. मलतवाडी येथे सुधीर मुतकेकर, गणेश विमं. निटुर येथे कविता पाटील, विमं घुलेवाडी येथे नारायण पाटील, विमं. किणी येथे ए के पाटील, श्रीराम विद्यालय कोवाड येथे मुख्याध्यापक वाय व्ही कांबळे, जयप्रकाश विद्यालय किणी येथे पी जे मोहनगेकर, विद्या मंदिर दुंडगेत सुवर्णा आंबेवाडकर तर जकनहट्टी येथे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख डी आय पाटील, केंद्र समन्वयक विलास शंकर पाटील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment