रविकिरण पेपर मिल कामगारांच्या उपोषणाला प्रारंभ, खासदार मंडलिक व आमदार पाटील यांनी दिली भेट - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2021

रविकिरण पेपर मिल कामगारांच्या उपोषणाला प्रारंभ, खासदार मंडलिक व आमदार पाटील यांनी दिली भेट

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे  रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे उपोषणाला  खा. मंडलिक व आ राजेश पाटील यांनी भेट दिली.

चंदगड / प्रतिनिधी 

       गेले सहा महिने आपल्या मागण्यांसाठी हलकर्णी औधोगिक वसाहती मधील  रविकिरण पेपर मिलचे जवळपास ७० कामगार सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून  आंदोलन करीत आहेत.  दरम्यान आज पासून या कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी उपोषण करणाऱ्या कामगारांची भेट घेतली.  जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत कामगारांचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन  यावेळी दिले.  

       रविकिरण पेपर मिलचे जवळपास ७० कामगार सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून  आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. कंपनीने त्यांची दखल घेतली नाही. कायम कामगारांना कंत्राटी करणे,  शासकीय नि यमाने देय असलेला महागाई भत्ता न देणे,  शासकीय आदेश न पाळणे, बिहार मधून आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन काम करणे आदी प्रकारचे अन्याय कंपनी करीत आहे. अखेर आनंद गणपती पारशे व सोमनाथ गोविंद गावडे पार्ले यांनी सर्व कामगारांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठीमाजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रा. एन. एस. पाटील, जि. प. सदस्यां विद्या पाटील,  पांडुरंग बेनके,   प्रताप डसके,  दयानंद देवण,  राहुल पाटील,  विष्णू गावडे,  तानाजी गडकरी,  भिकू गावडे,  अभय देसाई,  परशराम पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. 

No comments:

Post a Comment