![]() |
राजहंसगडावरुन शिवज्योत आणताना कालकुंद्री येथील तरुण. |
कालकुंद्री : प्रतिनिधी
शिवप्रेमी तरुणांनी राजहंसगड यळ्ळूर- बेळगाव वरून आणलेल्या शिवज्योतीच्या आगमनानंतर कालकुंद्री येथे अपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिव ज्योतीचे स्वागत सरपंच सौ छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते व प्रतिमापूजन नूतन ग्रापं सदस्यांच्या हस्ते झाले.
शिव पुतळ्याचे पूजन प्रमुख अतिथी अशोक कुमाणा पाटील यांच्या हस्ते झाले. कोरोना पार्श्वभूमीवर मुख्य मिरवणूक टाळून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीम पथक व शिवस्फूर्ती गीतांनी परिसरात उत्साह निर्माण केला. त्यांना सुभाष बेळगावकर, एन जे बाचुळकर यांचे मार्गदर्शन तर देवेंद्र कांबळे व विठ्ठल कांबळे आदींची संगीतसाथ लाभली. संत मिराबाई भजनी मंडळच्या महिलांनी पाळणा गीते गायली. यावेळी गावातील आजी-माजी सरपंच, सदस्य, उत्सव मंडळ कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्त जाणताराजा मंडळाच्यावतीने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत अध्यक्ष नारायण जोशी यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले. कालकुंद्री सह परिसरातील कुदनुर, राजगोळी बुद्रुक, कोवाड, किणी, राजगोळी खुर्द, कागणी, चन्नेटी आदी सर्व गावात भक्तिमय वातावरणात शांततेत उत्सव साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment