बोलेरो पलटी होऊन चक्काचूर, दोन जखमी? कोठे घडली ही घटना? वाचा सविस्तर............. - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2021

बोलेरो पलटी होऊन चक्काचूर, दोन जखमी? कोठे घडली ही घटना? वाचा सविस्तर.............

अपघातात बोलेरो पलटी झाल्याने बोलेरोचा चक्काचुर झाला.

                         

बेळगाव : विशेष प्रतिनिधी

     गोमटेश विद्यापीठ मार्गावर भरधाव वेगाने जाणारी बोलेरो जीप मंगळवारी (ता. 2) सकाळी ११ वाजता उलटली. यात ड्रायव्हर आणि दोन जण जखमी झाले. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. समोरून येणाऱ्या कारची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे नियंत्रण सुटले, आणि रस्त्याकडेला असलेल्या खडीवर जाऊन बोलेरो जीप उलटली. अपघातात ड्रायव्हर आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. 

अपघातामुळे स्मार्ट सिटीच्या अर्धवट राहिलेल्या कामांची दुरावस्था नागरिकांसमोर आली आहे. रस्त्याच्या कामाचे साहित्य रस्त्यावर तसेच पडलेले असल्याने वाहन चालकांना एकदम अंदाज येत नाही. स्मार्ट सिटीच्या रस्त्याची कामे काही ठिकाणी अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.



No comments:

Post a Comment