चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी कधी? वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2021

चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी कधी? वाचा सविस्तर.........


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुका ९ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तहसील कार्यालयाकडून सरपंच निवडीच्या तारीख जाहीर केली आहे. त्याचबरोबर या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 

गावांची नावे खालीलप्रमाणे - 

सर्वसाधारण : - हलकर्णी,  सुरुते,  किणी,  मुगळी-सोनारवाडी,  होसूर,  दाटे-बेळेभाट, इब्राहिमपूर, शिनोळी खुर्द, म्हाळेवाडी, बागिलगे, धुमडेवाडी, जांबरे, केरवडे-वाळकुळी, कौलगे, कळसगादे, घुल्लेवाडी-जक्कनहट्टी. 

महिला :- कालकुंद्री, बुक्कीहाळ, कानडी-पोवाचीवाडी, तेऊरवाडी, सरोळी, करेकुंडी, ढोलगरवाडी, राजगोळी खुर्द, नागवे,  कोवाड, मलतवाडी, तावरेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग - तुडये, आसगाव-हंबीरे-चुरणीचावाडा, सुळये. 

ना. मा. प्रवर्ग महिला: -दिंडलकोप-तळगुळी, देवरवाडी, किटवाड, पुंद्रा-कानूर बुदूक. 

अनुसूचित जमाती :- चिंचणे,

अनुसूचित जाती :- बसर्गे- गौळवाडी, सुंडी.

अनुसूचित जाती महिला:- माडवळे, हजगोळी, नांदवडे-शेवाळे, मांडेदुर्ग.
No comments:

Post a Comment