गवसे (ता. चंदगड) येथे वनविभागाच्या वतीने एलपीजी गॅस कनेक्शनचे वितरण करताना आमदार राजेश पाटील, वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, संगायोचे प्रविण वाटंगी व इतर |
चंदगड / प्रतिनिधी
वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजे गवसे (ता. चंदगड) येथे येथे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत एलपीजी गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रम करण्यात आला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत 28 लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी वनक्षेत्रपाल चंदगड डी. जी. राक्षे यांनी ग्रामस्थांना योजनेची माहिती देऊन वन संवर्धनातून होणारे गावातील जन वन जंगल जमीन या संसाधनाचे रक्षण व संवर्धन आणि यातून गावाला होणारा फायदा याचे महत्व या बाबींची माहिती ग्रामस्थांना दिली.
याप्रसंगी आमदार राजेश पाटील यांनी ``वनाचे महत्व मानवी हस्तक्षेपमुळे वनावर वाढलेला ताण आणि परिणामी बदललेले निसर्गचक्र या याविषयी बोलताना वनसंवर्धन व वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे, आपल्या गावाला लाभलेल्या निसर्ग संपत्तीचे जतन करणे, तिचे संरक्षण करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. वन विभागाच्या कार्याला आपण आपापल्या पद्धतीने सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास वेणुगोपाल इंण्डेन व संजय गांधी तालुका अध्यक्ष प्रवीण वाटंगी, गवसेचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्यासह वनविभागाचे वनपाल अनिल वाजे, वनरक्षक कल्पना पताडे, वनमजूर बाबू पवार, रमेश कोकितकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment