सामाजिक कार्याची जाणिव ठेवणारे व्यक्तिमत्व यमाजीराव गावडे - खासदार संजय मंडलिक - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2021

सामाजिक कार्याची जाणिव ठेवणारे व्यक्तिमत्व यमाजीराव गावडे - खासदार संजय मंडलिक

 

समाजकार्यातील योगदानाबद्द्ल यमाजी गावडे यांचा सत्कार करताना खासदार संजय मंडलिक, सोबत आमदार राजेश पाटील

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगडची भूमी ही रत्नांची खाण आहे. समाजासाठी आयुष्य वेचणारे कार्यकर्ते या तालूक्यात आहेत .सामाजिक कार्याची जाणिव ठेवणारे माणगाववाडीचे व्यक्तिमत्व  यमाजीराव गावडे गौरवास पात्र असल्याचे विचार खासदार संजय मंडलिक 
यांनी व्यक्त केले. माणगांववाडी (ता. चंदगड) येथील कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते .

खासदार मंडलिक पुढे बोलताना म्हणाले ,
यमाजीराव गावडे यांच्यासारखी समाजाला हत्तीचे बळ देणारी माणसे  चंदगड भुमीत आहेत. माणगांववाडी पंचक्रोशी व चंदगड तालुक्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून चंदगडकरांचे ऋण मी विकासकामातून फेडत राहीन असे स्पष्ट केले.
यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले,तालुक्यातील प्रश्न व विकासाठी मी कटीबद्ध असून मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी माझी सदैव वाटचाल सुरु आहे.   यमाजीराव गावडे कुटूंबिय समाजकार्यात अग्रेसर असून त्या कुटूंबाची संवेदनशिलता व सहकार्यवृत्ती आदर्शवत असलेचे सांगितले.याप्रसंगी खासदार संजय मंडलिक यांनी यमाजीराव गावडे यांना शाल,पुष्पगुच्छ देवून 71व्या वाढदिनाचे अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा  दिल्या .यावेळी भटक्या समाजासाठी अमूल्य  योगदानाबद्धल शिक्षक बाबुराव वरपे यांचा खासदार मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा काँग्रेस सचिव सुरेश कुराडे, भिकू गावडे,अभय देसाई,तानाजी गडकरी ,परशराम पाटील,अशोकराव देसाई,अनिल सुरुतकर,बंडोपंत चिगरे,.विष्णू आढाव,पी.बी.पाटील,
सुर्यकांत पाटील,नामदेव कोकीतकर, तुकाराम नार्वेकर ,प्रकाश पाटील.एस.पी.पाटील संजय पाटील  आदि मान्यवर तर                            नारायण गावडे,,बाळू चिगरे,अभिजित किल्लेदार,गणपत वाडीकर,विष्णू खोत,सुभाष खोत,सौ.भारती गावडे ग्रा.पं.सदस्या माणगांव, सौ.अनिता गावडे ,सौ.सुनंदा गावडे,सौ.सविता गावडे,संदेश खोत आदि ग्रामस्थ याबरोबर पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते ईश्वर गावडे  यांनी प्रास्ताविक केले,प्रा.निंगाप्पा गावडे यांनी  स्वागत केले.  संजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार  राजेंद्र गावडे  यानी मानले.


No comments:

Post a Comment