चंदगड तालुक्यातील बाधंकाम कामगरांंच्या स्वघोषणापत्रावर ग्रामसेवकनी स्वाक्षरी करावी - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2021

चंदगड तालुक्यातील बाधंकाम कामगरांंच्या स्वघोषणापत्रावर ग्रामसेवकनी स्वाक्षरी करावी

 


चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील बांधकाम व्यावसायात काम करणार्या कामगारांची महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडे नोंदणी सूरू आहे,या नोंदणीसाठी ग्रामसेवकांची स्वाक्षरी व शिक्का ग्राह्य मानला जात आहे, मात्र काही गावातील ग्रामसेवक या कामगारांना त्यांच्या स्वंयघोषणा पत्रावर स्वाक्षरी व शिक्का देण्यास टाळाटाळ करत आहेत.


  त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच कामगारांची  नोंदणी खोळबली आहे. व त्याना शाषनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. त्यामुळे तालूक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना स्वाक्षरी  व शिक्का देण्यास कळवावे असे निवेदन गटविकास अधिकारी यांना चंदगड तालूका बांधकाम संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.निवेदनावर अध्यक्ष कलाप्पा निवगीरे, उपाध्यक्ष बाबू चौगले, सचिव मोहन चौगले, खजिनदार, उमाजी पवार, सदस्य मारूती कांबळे, अवदुत भुजबळ, शिवाजी पाटील, सट्टूपा सुतार, तानाजी पाटील, मारूती पाथरूट,शिवाजी सुतार, सट्टूपा कांबळे,राजाराम राजगोळकर,विलास कांबळे, रघुनाथ पाटील आदीच्या स्वाक्षर्या आहेत. 



No comments:

Post a Comment