चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी येथील तलाठी कार्यालयातच चोराने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये कार्यालयातील प्रिंटर लंपास केला असून याप्रकरणी तलाठी अश्विनी पवार यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्केवाडी येथील तलाठी अश्विनी पवार या १७ फेब्रुवारीला नियमित कामकाज आटपून कार्यालयाला कुलूप लावून गेल्या होत्या. चार दिवस सुट्टी असल्यामुळे कार्यालयात आल्या नव्हत्या. त्यामुळे कार्यालय १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने डल्ला मारला. कार्यालयाचे शटर कट करून आतील लाकडी दरवाजाचे कडी तोडून तलाठी कार्यालयात प्रवेश केला. तसेच कार्यालयातील ब्रदर कंपनीचा प्रिंटर चोरून पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी अश्विनी पवार यांनी पोलीस पाटील माधुरी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक पवार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर चंदगड पोलिसात चोरीची तक्रार नोंद करण्यात आली आहे. चंदगड पोलीस पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment