रविकिरण पेपर मिल च्या कामगारांचे सातव्या दिवशीही आंदोलन सूरूच, एकाची प्रकृती बिघडली - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2021

रविकिरण पेपर मिल च्या कामगारांचे सातव्या दिवशीही आंदोलन सूरूच, एकाची प्रकृती बिघडली

 


चंदगड / प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यापासून हलकर्णी एमआयडीसी मधील रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचा संप सुरू आहे.  दरम्यान आज एका उपोषण कर्त्यांची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ' आम्हांला मरू द्या' आम्ही रुग्णालयात येणार नाही. अशी भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतल्याने पोलिसांची चांगलीच पळापळ झाली.दरम्यान आज पर्यंत कोणताही  शासकीय अधिकारी या अंदोलनाकडे फिरकला नाही.

     रविकिरण पेपर मिलचे जवळपास ७० कामगार सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून   आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. कंपनीने त्यांची दखल घेतली नाही.  कायम कामगारांना कंत्राटी करणे,  शासकीय नि यमाने देय असलेला महागाई भत्ता न देणे,  शासकीय आदेश न पाळणे, बिहार मधून आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन काम करणे आदी प्रकारचे अन्याय कंपनी करीत आहे. अखेर आनंद गणपती पारशे व सोमनाथ गोविंद गावडे पार्ले यांनी सर्व कामगारांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील,  जि.  प.  सदस्यां विद्या पाटील,प्रा एन. एस. पाटील,ॲड संतोष मळवीकर,उपसरपंच पांडुरंग बेनके,  प्रताप डसके,  दयानंद देवन,  राहुल पाटील,


सरपंच विष्णू गावडे,  तानाजी गडकरी,  भिकू गावडे,  अभय देसाई,  परशराम पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. 


No comments:

Post a Comment