रविकिरण आंदोलनामूळे हलकर्णी औधोगिक वसाहतीमधील उद्योगांना हानी पोहचेल - कंपनीतील कर्मचा-यांचे तहसिलदार, आमदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2021

रविकिरण आंदोलनामूळे हलकर्णी औधोगिक वसाहतीमधील उद्योगांना हानी पोहचेल - कंपनीतील कर्मचा-यांचे तहसिलदार, आमदारांना निवेदन

 

हलकर्णी (ता. चंदगड) येथीलऔद्योगिक वसाहती मधील रविकिरण पेपर मिल्स मध्ये सूरू असलेल्या आंदोलनााबाबत तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन देताना कामगार 


चंदगड/ प्रतिनिधी

 हलकर्णी (ता. चंदगड) येथील येथील औधोगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर मिल मधील काही कामगारांनी सूरू केलेल्या नियमबाह्य अंदोलनामुळे कंपनीसह या औद्योगिक वसाहती मधील सूरू असलेल्या उद्योगाना हानी पोहोचेल  असे वातावरण निर्माण केले जात आहे, त्यास प्रतिबंध करून उपाय योजना  करावी असे निवेदन कंपनीत कार्यरत असण-या कामगारांनी  आमदार राजेश पाटील व तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले आहे.  


निवेदनात म्हटले आहे. 


  रविकिरण पेपर मिल्स मधील  कर्मचारी असून कर्मचा-याना दर महिना पगार  न चुकता वेळच्यावेळी बँक खात्या मध्ये जमा होतो . तसेच कर्मचारी यांना  कंपनीकडून प्रॉव्हिडन्ट फंड इएस आय आणि पगारी रजा ( नियमानुसार ) मिळतात . आणि कंपनीमधील वातावरण हे गुण्या गोविंदाचे असल्याने येथे कोणत्या हि व्यक्तीला त्रास दिला जात नाही . कंपनीमध्ये जो काही संप केला जात आहे त्यात आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही आम्हाला वेळच्यावेळी सर्व सुविधा देतात . त्यामुळे  आमच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.कंपनीत काम करणारे आम्ही चंदगड तालुक्यातील रहिवासी आहोत.  म्हणून  आपले निदर्शनास सध्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसी परिसरातील एका उद्योगाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या काही कालावधी पासूनच्या आंदोलन आणि विविध धरणे निवेदने प्रचार इत्यादी प्रकार पाहत आलो आहोत वर्तमानपत्रातील काही बातम्याचेही याप्रकरणी अवलोकन केले गेले  त्यावरून असे समजून आले.हलकर्णी  औधोगिक वसाहती मध्ये सूरू असलेल्या  रविकिरण पेपर मिल्स मधील काही कामगारांनी 08/09/20 पासून त्यांच्या काही मागण्या स्तव संप पुकारलेला आहे व या संपाच्या अनुषंगाने त्यांची श्रमिक संघटना सर्व श्रमिक संघ या बॅनरखाली  कामगारांनी अंदोलन  सुरू केले आहे.  कामगारांनी संप करत असताना काही मागण्या उपस्थित केल्या यामध्ये प्रामुख्याने त्यांना महागाई भत्ता कंपनीकडून दिला जात नाही या एका मागणी साठी  वाद सुरू आहे व विविध सामाजिक राजकीय प्रतिनिधी त्यामध्ये सहभाग घेऊन कंपनीचे नावे मुख्य मागणीच्या अनुषंगाने संपास सुरुवात झाली आहे असे आढळून आले  आहे . बरेच दिवसांपासून या अपप्रचार चालू असल्याचे व या अनुषंगाने एमआयडीसीमधील उदयोगास हानी पोहोचेल असे वातवरण आहे, त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


No comments:

Post a Comment