![]() |
महागाव (ता.गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचा आज 24 वा वर्धापनादिन उत्साहात संपन्न झाला. |
चंदगड / प्रतिनिधी
गोरगरिब जनसामान्याच्या सेवेसाठी आधारवड ठरलेल्या महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचा आज 24 वा वर्धापनादिन उत्साहात झाला.
यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले. डॉ. यशवंत चव्हाण यानी स्वागत करुन हॉस्पिटलचा होत असलेले विविध आजारावरील अवघड शस्त्रक्रिया व उपचार, आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्नसेवा, तज्ञ डॉक्टर्स क्र्स यांनीची माहिती दिली.
नुकताच उत्कुष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून झालेला हॉस्पिटलचा गौरव, प्रमुख दहा मध्ये मिळालेले स्थान, एनएबीएच मानाकंन, याबरोबरच मिळालेले विविध पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
येथील तज्ञ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे तत्परतेच्या पाठबळावर जनसेवेचे हे कार्य याहूनही अधिक जोमाने व अखंड चालू राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अल्प दरातील आत्यधुनिक सेवेचा लाभ रुग्नानी घ्यावा असे आवाहन डॉ. चव्हाण याांनी केला.
यावेळी सचिव अॕड.बाळासाहेब चव्हाण, डाॕ.श्रीकांत हेब्बाळकर, डॉ. मंगल मोरबाळे , प्रा. विनय काईंगडे , व्यवस्थापक दिनकर फडके , डाॕक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment